Tuesday 30 January 2024

आजकालचं लग्न...

 आजकालचं लग्न...


तुम्हाला काय वाटते, आजकाल मुलींचं लग्न एका चांगल्या, सुशील, संस्कारी मुलांशी लावलं जातं...?

नाही... त्यांचं लग्न लावलं जातं ते मोठ्या घराशी, जमीन-जुमला, गाडी-बंगल्याशी, सरकारी नोकरीशी अन् अती महत्त्वाच्या पैश्याशी..

चांगला, संस्कारी मुलगा हे सगळं बोलण्यासाठी अन् नाममात्र आहे...

मुलगा कर्तृत्ववान आहे का नाही? कुणी बघत नाही... बघितलं जातं ते, त्याच्या बापाने किती जमीन, पैसा कमावलाय, त्यावरून मुलाला गृहीत धरणार... मग तो मुलगा बापाचा पैसा वाया घालवणारा का असेना...

मुलगा जबाबदार आहे का नाही...? कुणी विचारत नाही... विचारलं जातं ते. किती कमावतो... मग भले तो लग्नानंतर मुलीला मारहाण करो वा तिला सोडून एकटा वेगळा राहो..

बघितलं जातं की, मुलगा ला नंतर एकटा राहणार की आई-वडील, भाऊ-बहिण, परिवार तेही असणार त्याच्यासोबत...

बघितलं जातं की, मुलाने २-३ वर्षात निवासी (परक्या) शहरात फ्लॅट घेतला आहे की नाही 

गाडी घेतली आहे की नाही... हा ती गोष्ट वेगळी की, मुलाच्या बापाला आयुष्याची २०-२५ वर्ष परक्या शहरात घासूनही

घर घेता आलं नाही किंवा एवढ्या वर्षांनंतर घेतलं... पण त्या मुलाचं मात्र २-३ वर्षात घर असलं पाहिजे...

आई आई वडील वडील म्हणून काळजी असणं स्वाभाविक आहे...

पण कुठतरी भौतिक, आर्थिक सुख बघून, तुम्ही मानसिक छळ करताय स्वतःच्या मुलीचा अन् अपमान करताय त्या कर्तुत्ववान मुलाचा...

बाकी, या सर्व गोष्टी बघून केलेल्या विवाहापश्चात तुमची मुलगी किती सुखी अन् दुःखी आहे, ती मुलाच्या घरी आहे की परत तुमच्याच घरी आहे... हे तुम्हालाच माहिती...

असो अजून बरच काही बोलण्यासारखं आहे, पण तूर्त या थोडक्यात मांडलेल्या गोष्टीवर विचार करा...

No comments:

Post a Comment

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...