Monday 18 December 2023

सवसार...

सवसार
 

तुम्ही प्रेम करता एकमेकांवर सगळं मान्य आहे त्या verification फक्त लग्न झाल्यावरच भेटतं ,
फक्त msg वर propose accept करून काही होत नाही त्यासाठी सात जन्मांचे फेरे घ्यावे लागतात .

सवसार म्हणजे बैलगाडी ची दोन चाक असतात ,ते सोबत असतात तितपर्यंत सगळं ठीक असतं जेव्हा एक जरी चाक तुटलं पूर्ण सवसार उध्वस्त होतो .

मी अस नाही बोलत की सवसार करणं अवघड असतं ,ते अवघड किंवा सोपं ते तुमच्यावर असतं तुम्ही एकमेकांना कशी साथ देता त्यावर अवलंबून असतं ..

भांडण होतात ते सगळं normal आहे रे कारण दोन विचारांची माणसं एकत्र आल्यावर मतभेद तर असणारच पण त्याची हळू हळू सवय होऊन जाते .

सुरवातीला आपल्याला त्यांच्या काही गोष्टी नाही पटत पण ती व्यक्ती तशीच आहे असं समजून आपण त्याच विचार करणं सोडून देतो ..

प्रेम आणि लग्न यात खूप अंतर आहे रे ,सगळेच प्रेम करणारे लग्न नाही करत ,क्वचितच काही असतात जे पुढे जाऊन लग्न करतात …

Normal life ते married life मध्ये लग्न हीच एक विधी असते जी आपलं आयुष्य बनवते किंवा बिघडवते ..
एकदा लग्न झाल्यावर तुम्ही एकमेकांना दोष नाही देऊ शकत की यांच्यामुळे अस झालं किंवा यांची चुकी होती ,

चूक दोघांचीही असते यात कारण टाळी फक्त एका हाताने वाजत नसते 
उलट सवसार पण अस करा लोकांनी पण नाव ठेवली पाहिजे की किती सुंदर couples आहेत हे ..

सगळे फक्त अक्षदा टाकने पुरतेच तुमच्यासोबत असतील नंतर सवसार त्या दोघांनाच चालवावा लागतो ..❣️


No comments:

Post a Comment

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...