Friday 1 March 2024

 महागाईचा आलेख

दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी 

काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल. 

स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ही मुलगाच घेणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही मुलगाच करणार,

संसार मुलगाच करणार ? 

का संसार फक्त मुलाचांच आहे का ? 


*मग मुलगी घरी काय करणार ?*

मुलींची आणि त्यांच्या पालकांची जी अपेक्षा आहे ना की, श्रीमंत घरी जायचंय. 

        *ते बंद करा मुलांनो, मुलींना झाडावरुन खाली उतरवण्याचे काम तुमचे आहे.*

       मुलांनो लक्षात ठेवा सगळ्या चाव्या तुमच्या हातात आहेत. तुम्ही मूर्खासारखे खुप अवघड आहे, म्हणून रडत बसलांय. 

        तुमचीच शेती/कष्ट/ कार/पगार/घर, तुम्हांलाच ठरवायचंय की पुढे जायचंय की नाही. 

तुम्हांला घरी नवीन सदस्य आणायचांय ना ?

मग तुम्हींच जास्त पारखले पाहिजे ना ?

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलींना घरी बसून खायची पद्धत बंद करा. मुली बऱ्याच गोष्टीत आधुनिक झाल्यात,

तुम्ही त्याच जुन्या जमान्यात अजून जगतांय. मुलांनो जवळजवळ सगळ्याच मुलींना श्रीमंताच्या घरी जायचंय.

जरा लघु उद्योजक,

शेतकरी,

छोटे दुकान व्यापारी, 

कमी पगार असणारे इंजीनियर /डॉक्टर/वकील/रिसेप्शनिस्ट/ऑफिसबॉय/सेक्युरिटी गार्ड/ शिपाई यांच्याशी कोण लग्न करणार, का त्यांना मन/इच्छा नाही का ?

       मुलींच्या अपेक्षा खुप वाढल्यात असे बोलुन चालणार नाही. जो पर्यंत मुलेही त्यांच्या अपेक्षा वाढवत नाहीत ना आणि मुलींना स्पष्टपणे 

सांगत नाही ना की,  

आम्ही आमच्याच लेव्हलचेच स्थळ पाहतोय /तुमच्या अपेक्षा खुप जास्त आहेत.

तोपर्यंत हे असेच चालत राहील.

मुलांनो जर तुम्हांला नोकरी नसेल तर कोणी मुलगी देईल का ?

चांगला पगार नसेल तर 

कोणी मुलगी देईल का ? 

जर तुमच्याकडे शेती नसेल तर कोणी मुलगी देईल का ? 

जर तुमच्याकडे स्वतःचे घर नसेल तर कोणी मुलगी देईल का ? 

मग मुलीकडेही या गोष्टी नसतील तर मग मुलानं का करावे अशा स्थळाशी लग्न ?

मुलांनो त्यामुळे वेळीच जागे व्हा.

        मग मुलीं कडच्यांनाही कळू द्या की, तुम्ही आयतं बसून खायचं आमंत्रण देताय.

हे लक्षात ठेवा 

🙏 *मुलींच्या पालकांना नम्र विनंती* 👏

विचार करायला लावणारे...

नुसता *Biodata* बघुन न थांबता प्रत्यक्ष *स्थळाला* भेट देऊन *परिस्थिती* पाहणी करा मग निर्णय घ्या. प्रत्येकाला *सरकारी* नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना *सरकारी नोकरी* लावु शकतो कां? याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका. नाहीतर *इम्रान खान सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही*.....

       *शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत* आणि *श्रीमंतीची वाट* लावणारीही मुले आहेत. नुसती *डिग्री* बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे. बिचारी इंजिनिअर झालेली मुले *Company* मधे *8000/-* पगाराने सुपरव्हिजन करतात. *पोलिस भरतीत* जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुल बिचारे *रांगेत* उभे राहतात. कदाचित त्या रांगेत *आपलाही मुलगा* असू शकतो याचा विचार करा आणि *प्रत्यक्ष स्थळ* बघा मगच *निर्णय* घ्या. आणि नुसती डिग्रीच बघायची असेल तर *रात्री 9:00 नंतर बियरबार मधे जाऊन बघा* अनेक डिग्रीवाले दिसतील. बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है ! *आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते* कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 25 ते 28 वर्षाच्या आहेत. त्यांच्या *ईच्छा, भावना* यांचा विचार करत नाही. आजच्या युगात आयुष्य सरासरी 60 वर्ष आहे, 30 वर्षात कोणते सुख मिळवायचे. 

*खोट्या बोलणाऱ्यावर प्रेम करा आणि मुलींचा संसार खराब करा..* सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा *1,00,000/-रू आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो.*🤔

 युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. *"मरायच* सर्वांना आहे, परंतु .. *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची* परिस्थिती तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेतकऱ्याशी लग्न "* करावं असं कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"* वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी असं कोणालाच वाटत नाही.. *विचार* करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही.. 

🎤 **😴

*पुढे पाठवा..परिवर्तन घडवा*                         

      🛐

बायोडाटा पाहून नातेसंबंध तयार

 👍 फक्त बायोडाटा पाहून नातेसंबंध तयार होत नाहीत,संवाद साधा,कॉल करा.

👍 समोरच्या व्यक्तींची फोन येण्याची वाट पाहू नका,स्वतः कॉल करा.

👍 मंगल कधीच अमंगल होत नाही, विवाह हे शुभ कार्य आहे.

👍 आपली मुलगी स्टार आहे,तर त्यांचा मुलगाही सुपरस्टार आहे

👍 ९० टक्के लोक आपल्या सारखीच आहेत,सर्व गुणसंपन्न कोणीच नाही.

👍 विवाह योग्य वयातच विवाह करा, वय वाढत जाणं योग्य नाही.

👍 सूट होईल त्यांच्याशीच संपर्क करा,ज्यांच्या अपेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी वेळ वाया घालू नका, त्यांच्या अपेक्षा आहेत,त्यात तुम्ही असाल तर ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील हे लक्षात ठेवा.

👍 रंग रूपापेक्षा गुणांकडे लक्ष द्या,प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कमी असणारच आहे.त्यासाठी पुढे ॲडजस्टमेंट करा.

👍 तुम्हाला कॉल करेल त्याचा सन्मान करा,स्थळ तुम्हाला पसंत नसेल तर योग्य कारण सांगून नकार कळवा,कदाचित तुम्हाला अपेक्षित असणारं स्थळ त्यांच्या एखाद्या नातेवाईकाकडे ही असू शकते,हा विचार करा.

👍 अमिताभजीपेक्षा जया उंचीने १२ इंच छोटी होत्या.

👍 करीना सैफ अली पेक्षा सोळा वर्षांनी लहान होती.

👍 सचिन पेक्षा अंजली तीन वर्षाने मोठी आहे.

👍 ऐश्वर्याला मंगळ होता, अभिषेकला मंगळ नव्हता

👍 दुसऱ्या मधील कमीपणा शोधण्यापेक्षा आपल्यातील दोष शोधा.

👍 सकारात्मकता बाळगा.

स्थळ पाहताना...

 स्थळ पाहताना

🔐🔐🔐🔐🔐

*मुलीचे पालक* :- मुलाला पगार किती आहे ?

स्वत:चे घर आहे का ?

गावी शेती आहे का? 

कार आहे का ? 

अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का ?

बहिणींची लग्न झाली आहेत का ?

आई-वडिल कुठे असतात ?


*मुलगा* : मुलगी काय करते ?

*मुलीचे पालक* : डिग्री झालीयं नोकरी शोधत आहे, 

डिप्लोमा कोर्स करतेयं,

सर्व्हीस आधी करत होती,

लग्नाचं चाललयं म्हणून सोडलीयं...

आता २-३ महिन्यात लगेचंच,

ऑफिस लांब पडतंय

म्हणून जॉब सोडलायं, 

घरीच असते, तिला गृहसजावटीची आवड आहे.


 *मुलगा* :- *मग तुम्ही अस स्थळ का नाही शोधत ?* 

        जो मुलगा नोकरी शोधतोय किंवा ज्याला पुढे लागणार आहे ? 

काका, एक साधी गोष्ट आहे. 

जर मुलाकडे नोकरी,

घर,

शेती, 

गाडी नसेल तर तुम्ही *तुमची मुलगी द्याल का ?*

नाही ना ?

तर मग *मुलीकडे काहीही नसताना मुलाने का करावे अशा मुलीशी लग्न ?*

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 

*पगार माझा,* 

*घर माझं,* 

*शेती माझी,* 

*कार माझी,* 

*कष्ट माझे,* 

*इन्व्हेस्टमेंट माझी.* 

*मी काय मूर्ख आहे काय ? तुमच्या मुलीला फुकट पोसायला ?*

पूर्वीचा जमाना गेला काका, जेंव्हा पुर्वीचे लोक हुंडा द्यायचे व घ्यायचे, आता जमाना बदललाय,

तुम्ही तुमच्या स्वप्‍नातल्या अपेक्षा बदला आणि हो महत्त्वाचे म्हणजे तुमची मुलगी घरी येऊन काय

आयत्या पिठावर रेघोट्या 

मारणार का?

मुलीची बाजु म्हटले की, 

लग्नानंतर करेल की ,

*शिकेल की ,*

होईल की,

*जमेल की,*

लागेल की,

*बघु की.*


        पण तुम्हांला आणि तुमच्या मुलीला मुलगा मात्र रेडीमेड तयार पाहिजे.

कुठेही कमी नको,

असं कसं चालेल काका.

साधी गोष्ट आहे काका, तुम्हांला जसे सर्वगुणसंपन्न मुलगा हवाय मग मुलाकडचे ही सर्वगुण संपन्न मुलगीच बघणार ना.


      मुलींकडच्यांना अजूनही कळत नाहीये कि, लग्नाचे स्वरूप बदलत्या काळानुसार पूर्णपणे बदलले आहे. ते अजूनही *मुलगी द्यावी श्रीमंत घरी* आणि *सून आणावी गरीब घरची.* या आधारावर स्थळे शोधात आहेत आणि याउलट 

मुलाकडील अगदी 

प्रॅक्टिकल विचार करून 

 *जो कष्ट करतो, त्याच्याच घरी लक्ष्मी वास करते.* 


        या आधारावर स्थळे 

शोधात आहेत. समोरून चालून आलेले स्थळ मुलींकडचे उद्धट उत्तर देऊन नकार देताहेत का तर कोणीतरी करोडपती/श्रीमंत स्थळ येऊन माझ्या मुलीला येऊन घेऊन जाणार आहे. 

आशा 'स्वप्नांच्या दुनियेत अजूनही आहेत. 


        मुली आणि त्यांचा पालक भारी-भारी श्रीमंत वेल-सेटल स्थळ शोधून काढतायेत आणि फोन करतात जेने करून मुलीला पुढे कोणतेही त्रास नको.


        मुलांकडील फक्त आणि 

फक्त मुलींबद्दल विचारणा करतात आणि मुलींकडचे

 *पगार,* 

 *घर,* 

 *शेती,* 

 *बहिणीची लग्न,* 

 *आई-वडिल कुठे असतात,*

*इन्व्हेस्टमेंट* आणि *अजून बरंच काही.* 

मग मुलांनो व्यक्ती म्हणून तुम्हांला काय महत्व ? 

तुमचा उपयोग मग काय ?

फक्त एटीएम मशीन का ?


         मुलांनो एक साधी गोष्ट आहे. जर तुम्हांला बारावीला चाळीस-पन्नास टक्के मार्क्स् पडले तर पुढील शिक्षणांसाठी चांगले कॉलेज मिळेल का ? 

नाही ना ?


         मुलींच काय आहे ना की, स्वतःला पडलेत चाळीस-पन्नास टक्के 

आणि एडमिशन हवंय हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये.


 मुलांनो खालील खर्चाचा 

*कधी विचार केलाय का ?* 


 १. शहरातील एका मुलाच्या

 शिक्षणाचा खर्च....

(ग्रॅज्युएशन पर्यंतच फक्त १२ + ४ ) इथून पुढे कमीत कमी २० लाख. बाकीचे खर्च अजून वेगळेच. 


२. आई-वडिलांचा (म्हातारपणात) आजारपणाचा खर्च

(वाढत्या वयांनुसार बीपी, शुगर, दातांच्या समस्या, संधिवात, डोळ्यांची दृष्टी, अजूनही काही गंभीर आजार व त्यांचा खर्च विचार न केलालाच बरा. )  


३. मुलीच्या गर्भारपणांतील वर्षभरातील नियमित तपासण्या, औषधं, त्याप्रमाणे आहारा वरील खर्च. डिलीव्हरीचा खर्च.


४. मुलांच्या (लहान वयात) सर्दी, खोकला, ताप, आजाराचा खर्च, डायपरचा खर्च (दररोज कमीत कमी तीन वर्षांपर्यंत), 

 *जुळे झाले तर मग डबल धमाका.* 


५. बायकोच्या व स्वत:चा 

घरातील कार्यक्रम – 

नातेवाईकांचे लग्न (आहेर), 

लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च), 

डोहाळजेवणं, सुपारी कार्यक्रम, गावांला जाणे येणे,

कार्यक्रमासाठी नवीन कपडे खरेदी आणि या सर्वांचा पेट्रोल व टोलखर्च.


५. मित्र-मैत्रिणींचे कार्यक्रम–

लग्न (आहेर),

लहान मुलांचे वाढदिवस (गिफ्ट् खर्च) , 

डोहाळजेवणं, 

सुपारी कार्यक्रमाला जाणे येणे, कार्यक्रमांसाठी 

नवीन कपडे खरेदी आणि 

या सर्वांचा पेट्रोल व टोलखर्च.


६. महिनाभराचा मोबाइल, डिश टीव्ही रिचार्ज, कामवाली, महिनाभराचा बाजार, पेट्रोल, लाईट बील, घरपट्टी, पाणीपट्टी, सोसायटी मेंटेनन्स.


७. एक वेळ साधे बाहेर जेवायला बसले तर, एक हजार रुपये पुरत नाहीत.


८. घराचे हफ्ते कमीत कमी 

२० वर्षे ते पण नोकरी असेल तोपर्यंत.

 

        बघितले ना ? सगळी अवघड कामे मुलांकडे आणि

*मुलींकडच्यांना हे सगळं सोपच वाटतंय.*

Tuesday 30 January 2024

आजकालचं लग्न...

 आजकालचं लग्न...


तुम्हाला काय वाटते, आजकाल मुलींचं लग्न एका चांगल्या, सुशील, संस्कारी मुलांशी लावलं जातं...?

नाही... त्यांचं लग्न लावलं जातं ते मोठ्या घराशी, जमीन-जुमला, गाडी-बंगल्याशी, सरकारी नोकरीशी अन् अती महत्त्वाच्या पैश्याशी..

चांगला, संस्कारी मुलगा हे सगळं बोलण्यासाठी अन् नाममात्र आहे...

मुलगा कर्तृत्ववान आहे का नाही? कुणी बघत नाही... बघितलं जातं ते, त्याच्या बापाने किती जमीन, पैसा कमावलाय, त्यावरून मुलाला गृहीत धरणार... मग तो मुलगा बापाचा पैसा वाया घालवणारा का असेना...

मुलगा जबाबदार आहे का नाही...? कुणी विचारत नाही... विचारलं जातं ते. किती कमावतो... मग भले तो लग्नानंतर मुलीला मारहाण करो वा तिला सोडून एकटा वेगळा राहो..

बघितलं जातं की, मुलगा ला नंतर एकटा राहणार की आई-वडील, भाऊ-बहिण, परिवार तेही असणार त्याच्यासोबत...

बघितलं जातं की, मुलाने २-३ वर्षात निवासी (परक्या) शहरात फ्लॅट घेतला आहे की नाही 

गाडी घेतली आहे की नाही... हा ती गोष्ट वेगळी की, मुलाच्या बापाला आयुष्याची २०-२५ वर्ष परक्या शहरात घासूनही

घर घेता आलं नाही किंवा एवढ्या वर्षांनंतर घेतलं... पण त्या मुलाचं मात्र २-३ वर्षात घर असलं पाहिजे...

आई आई वडील वडील म्हणून काळजी असणं स्वाभाविक आहे...

पण कुठतरी भौतिक, आर्थिक सुख बघून, तुम्ही मानसिक छळ करताय स्वतःच्या मुलीचा अन् अपमान करताय त्या कर्तुत्ववान मुलाचा...

बाकी, या सर्व गोष्टी बघून केलेल्या विवाहापश्चात तुमची मुलगी किती सुखी अन् दुःखी आहे, ती मुलाच्या घरी आहे की परत तुमच्याच घरी आहे... हे तुम्हालाच माहिती...

असो अजून बरच काही बोलण्यासारखं आहे, पण तूर्त या थोडक्यात मांडलेल्या गोष्टीवर विचार करा...

Friday 5 January 2024

Registration Information


            Royal Marriage Bureau 

YOUTUBE   











All Cast Marathi Matrimony Online Services
 

  लग्न करायचय 
मग विचार कसला
     करताय ?

लगेचच
https://www.royalmarriagebureau.com या website वर online Regstration करा.

नमस्ते,
             रॉयल मॅरेज ब्युरो मध्ये सर्वांचे स्वागत आहे.
 आम्ही बारामती मध्ये Royal marriage  Bureau या नावाने ऑनलाईन पद्धतीने वधु - वर सुचक चालू केले आहे.

                यामध्ये तुम्ही मोफत नाव नोंदणी करुन घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून Royal  Marriage Bureau
 च्या वेबसाईटद्वारे तुमच्या समाजातील - तुमच्या अपेक्षेप्रमाणे - मुला मुलींचे भरपूर स्थळे तुम्हाला पाहता येणार आहेत.

जसे की, जात, शिक्षण - व्यवसाय - नोकरी, उंची - वयानुसार भरपूर स्थळे पाहू शकता.

          पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील वधू-वरांची नाव नोंदणी मोफत सुरू आहे.
  जोडीदार उमेदवारांची प्रोफाइल व माहिती तुम्ही मोफत पाहू शकता.
 त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहायचे असल्यास Primium Membership ( रिचार्ज )  भरून पाहू शकता व तुम्हाला मॅचिंग झालेल्या स्थळांना व पसंत पडणाऱ्या स्थळांना संपर्क करू शकता.
पूर्ण प्रोसेस Website च्या माध्यमातून आहे.


जे मुलं - मुली लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी स्वतःचा पूर्ण माहितीसह  बायोडाटा फार्म भरा.

1. प्रोफाइल रजिस्टेशन- मोबाईल नंबर (ओटीपी जातो)
मोबाईल नंबर व्हेरिफाय करणे.
2. आपल्याबद्दल माहिती भरावी.
3. जोडीदाराबद्दल अपेक्षा माहिती भरावी.
4. ओळखपत्र म्हणून - आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक अपलोड करा.
5. प्रोफाईल फोटो कमीत कमी तीन अपलोड करा.

         किंवा 

वरील सर्व माहिती 7020403671 या WhatsApp No वर पाठवा. तुमचा बायोडाटा वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला आयडी अँन्ड पासवर्ड दिला जाईल.

वरील तुमच्या बायोडाटा - प्रोफाईल सोबत website वर  Social media म्हणजेच Instagram, Facebook, Twitter दाखवले जाईल.

त्यासाठी तुम्हाला Social media ची लिंक ॲड करावी लागेल नंतर तुम्ही दुसऱ्यांची Social media पाहू शकता व दाखवू शकता.

पूर्ण प्रोसेस Website  च्या माध्यमातून आहे.

टिपः रॉयल मॅरेज ब्युरो च्या नावाने कोणालाही पैसे देऊ नका.
आम्ही कोणालाही फोन करून कशाची मागणी करत नाही. त्यास Royal Marriage Bureau जबाबदार राहणार नाही.

कृपया हा मेसेज सर्व लग्न घरात, सर्व मित्र परिवारांना, नातेवाईकांना व इतर WhatsApp Group, Telegram Group, Facebook Group- page व इतर Social media वर शेअर करा म्हणजे गरजूंना याचा लाभ घेता येईल. 

नाव नोंदणी करायच्या वेळेस रॉयल मॅरेज ब्युरो ची Term and Condition जरूर वाचा.
मराठी मध्ये Translate करून वाचा.

अधिक माहितीसाठी संपर्क :
Mahendra Dhumal 
WhatsApp No : 7020403671.
Email ID :     
ceo@royalmarriagebureau.com

Website link:

महत्त्वाची सूचना :

प्रथमदर्शनी आम्ही फक्त तुम्हाला वेबसाईट द्वारे मुला-मुलींची मॅचिंग झालेली स्थळे दाखवतो.
तुम्हाला मॅचिंग झालेल्या स्थळांना व पसंत पडणाऱ्या स्थळांना संपर्क करू शकता
तर लग्न जमवताना स्वतः मुला मुलींच्या घरी जाऊन योग्य ती चौकशी करून लग्नासाठी योग्य तो निर्णय घ्यावा.
 ही जबाबदारी तुमची राहील.
 याला रॉयल मॅरेज ब्युरो जबाबदार राहणार नाही.

www.royalmarriagebureau.com या वेबसाईटवर फ्री ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आणि खालील मेंबरशिप प्लॅन चॉईस करून ते भरा आणि तुम्हाला जुळणाऱ्या व आवडणाऱ्या स्थळांना त्वरित संपर्क करा.









      

Sunday 24 December 2023

तुझ्या सोबत चालताना

तुझ्या सोबत चालताना


तुझ्या सोबत चालताना मी पण वचन दिले आहेत की मी तुला नेहमी खुश ठेवीन आणि फक्त बाहेरून दाखवण्यापूरता नाही तर मनानी सुद्धा ..

तुझ्या सोबत सात फेरे घेताना जशी ती गाठ घट्ट राहते तशी तुझ्या माझ्यातील गाठ पण घट्ट राहील खूप जन्म ..

जशी तू माझी उष्टी हळद लावली आहेस तसच तू माझ्या अर्ध्या आयुष्याचा भाग हलका केला आहेस,

तुझ्या सोबत चालताना खूप कठीण प्रसंग येतील पण ते शब्द मी कधीच मागे नाही घेणार जे तुला लग्नाच्या वेळेस दिले होते ,

मला माहित आहे आई वडिलांना सोडून परक्या माणसांच्या घरी आपण एक दिवस सुद्धा नाही राहू शकत नाही, तुझं तर पूर्ण आयुष्य जाणार आहे ,
तरी मी पूर्ण प्रयत्न करीन तुला घरच्यांची आठवण नाही येणार ते त्या दिवसापासून ..

हा एवढं सोपं नसणार आहे माहीत आहे पण जबाबदारी आल्यावर बरोबर सगळं होत,आपण पण adjustment करायला लागतो त्याप्रमाणे ..

तुझ्या बाबांना सांग लग्नाचं जास्त tension नका घेऊ ,काही problem आलं पैश्याच तर आपण एकत्र मिळून खर्च करू .

अस होत की लग्नाच्या वेळेस कोणी ना कोणीतरी रागवत म्हणून सगळ्यांना सांभाळून घेईला लागेल ,कारण प्रश्न फक्त आपला नाही आहे तर आपल्या कुटुंबाचा सुद्धा आहे .

ते सगळं ठीक आहे फक्त तू नेहमी माझ्या सोबत रहा बाकी सगळं बघून घेऊन आपण ..❤️😊

लग्ना आधी तरी सगलेच खूप promise करतात .
आपल्या जोडीदाराला ..
पण तेच promise लग्ना नंतर का
अपुरे राहतात ते कळत नाही…

लवकर विवाह "न" जमण्याची काहीं कारणे..!



लवकर विवाह "न" जमण्याची काहीं कारणे..! 

चालू वर्षी गुरूबल नाही, चंद्रबल नाही. त्यामुळे योग नाही. असं असणाऱ्यांची संख्या अल्प असते. पण पूर्ण दैवावरच हवाला ठेवून हतबल राहाणाऱ्यांची संख्याही बरीच असते. संधी ही अनेकदा येत असते. म्हणजे योग अनेकदा येत असतो. नशिब ५०% असतं. परंतु आपले प्रयत्नही ५०% असायलाच हवे असतात.

(उदा. जेवणाचे ताट समोर आले आहे. 
पण आपण हातच हालवला नाही तर...?)

अनेकांच्या बाबतीत हेच घडतंय. पाचेक वर्षातील अनुभवांती जे दिसलंय ते स्पष्टपणे लिहिलय..!

▶ एखादे स्थळ चालून आले आहे. 
त्वरित प्रतिसाद न देणे.

▶ स्थळ पाहून झाल्यावर स्वतः काही न कळवता दुसऱ्याच्या उत्तराची वाट पाहाणे.

▶ होकार / नकार कळविण्यात टाळाटाळ किंवा विलंब करणे.

▶ फोन आला असता- "मग सांगतो, विचारून सांगतो" असे म्हणून घोंगडे भिजत ठेवणे. म्हणजेच त्या स्थळाला दुसरीकडे जायला वाट मोकळी करून देणे.

▶ वधू-वर केंद्राकडून कित्तीही बायोडाटे आले तरी आणखी काही नविन येताहेत कां? याची वाट पहात राहणे.

▶ सगळं सगळं जुळत असतानाही ह्याही पेक्षा आणखी कुठं असेल कां? हा शोध चालूच ठेवणे.

▶ शुल्लक बाबीचा दोष काढणे. रंग' उंची, पगारातील तफावत, शेती नाही. (असली किंवा घेतली तर कसणार कोण ?) पुणे, मुंबईत फ्लॅट नाही. (आपण पुण्यात आलो तेंव्हा होता कां?) जमवण्या पेक्षा फिस्कटवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे.

▶ मेकअप थापलेले व खास तयार करून घेतलेले फोटो पाठवून स्थळांची फसवणूक करणे. (जसं आहोत तसा फोटो असावा. व्यक्तीमत्व महत्वाचे असते. प्रसन्न चेहरा व बोलण्यातील गोडवा हाच आपला ठसा उमटवण्याची साधने आहेत)

▶ अनेक वेळा अनेक फोटो मागवणे. प्रत्यक्ष मुलगा / मुलगी न पाहाता फोटोवरून रंग, चेहरा, बांधा, स्वभाव ह्याचा (खोटा) अंदाज बांधणे.

▶ प्रत्यक्ष भेट देवून पाहणे, समक्ष मुलगा/ मुलगी त्यांचे कुटुंबिय ह्यांच्याशी भरपूर बोलणे. वय, शिक्षण, नोकरीचे ठिकाण इ. बाबीकडे जातीने लक्ष न देता, भलत्यानांच फोन करुन गुप्तहेर असल्यासारखे माहित्या काढणे, पण स्वतः घर सोडणे नाही.

▶ "रजा नाही." "वेळ नाही". अशी लांबड लावून हातचे स्थळ घालवणे. (जणू कंपनी बंद पडतेय.) पाहूण्यांपैंच्या लग्नाला मात्र हजर. (तिथं अंदाजपंचे शोध सुरू ठेवणे.)

▶ मुलां / मुलींनी काही कारणे पुढे करून, टाळाटाळ करणे व पालकांनी आपला संसार विषयक अनुभव गुंडाळून ठेवून त्यांचेच समर्थन करणे.

▶ आपण स्वतःला आरशात न पहाता इतरांचे माप काढणे.

▶ टीव्ही, चॅनेल वरील हिरो, हिरॉईन प्रमाणे संसाराचा साथीदार असावा. अशी भ्रामक कल्पना बाळगणे.

▶ पालकांनी बऱ्याच वेळा फोन बंद ठेवणं, लवकर फोन न उचलणं, स्वतः पुन्हा फोन न लावणं.

▶ पालकांनी वधू-वर केंद्राकडे स्वतःचा किंवा घरातील व्यक्तीचा व्हॉटअॅप नंबर न देणं. (त्यामुळे माहिती, याद्या, फोटो बाहेरगावी -मुलां, मुलींकडेच जातात. ह्यातील सगळं घरच्यां पर्यंत पोहोचतच असं नाही.).

▶ स्थळाची पसंती करणारे प्रमुख घटक म्हणजे - दोन्ही कडील आई, वडील, मुलगा व मुलगी आणि कुटुंबातील काही घटक. ह्यानी सर्व चौकशी करुन विवाह निश्चिती करण्या ऐवजी अनेकांना वेळोवेळी बघण्यासाठी पाठवणे. आणि त्या बघ्या मंडळीवर अधिक विश्वास ठेवणे.

▶ मुलगी पाहाणे ह्या कार्यक्रमाचे वेळी मुलगा व मुलीस आपसात संवाद साधणेसाठी किमान दहा मिनीटे तरी वेळ देण्यास टाळाटाळ करणे. ('जे आयुष्यात पहिल्यांदाच भेटताहेत व पुढं उभं आयुष्य काढायचंय त्यांचेसाठी मतं मांडायला संधी हवीय हो!').

▶ कुटुंबात ऐनवेळी मतभिन्नता उफाळून येणे.
▶ मुला/मुलींचं वय अधिक वाढलं तरी सुद्धा बिनधास्तपणे, असतात, मिळतात अशी सुद्धा स्थळं ? असं म्हणत राहाणं. (विवाहात वयाला महत्व असते. बाकी सर्व गौण असते याचे भान विसरणे!).

▶ मुलां / मुलींनी एका वेगळ्याच विश्वात रममाण होऊन राहणं / करिअरच्या नादात विवाह लांबणीवर टाकणं . (वय वाढतं, सौंदर्य घसरू लागते. तब्बेत पसरू लागते किंवा घटू लागते. केस, नजर साथ सोडू लागतात. कदाचित संतती प्राप्ती बाबत काहींना समस्याही निर्माण होण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं. म्हणून वय वाढल्यावर काहीही पत्करण्या पेक्षा योग्य वेळेत निर्णय घ्यावा.).

▶ कुटुंबातील व्यक्तीनी आपलं पद, प्रतिष्ठा, पैसा ह्यांची तुलना येणाऱ्या स्थळांबरोबर करणं. (प्रत्येकाचं नशिब वेगळं असतं.)

▶ पत्रिका पाहाताना खूप म्हणजे खूपच खोलात शिरणे. (यासाठी वरील ऑडिओ पूर्णपणे ऐकवा?) चांगलं भरपूर असलं तरी, थोडं दोषाचं दिसताच (इतर ठिकाणी पत्रिका न तपासता... पटकन नकार देणं. 
(आता सगळ्यानां सगळे ग्रह विशेषतः मंगळ कळायला लागलाय. पालकांच्या लग्नावेळी असं होत कां? जन्म तारखा खऱ्या होत्याकां? शाळेत घातलेली तारखेपासून ५ किंवा ६ वर्षापूर्वी चा दिवस हा जनमतारिख असायची) 

▶ सगळं पक्क झालं तरी बैठकीत कार्यालय कुठे? कसे आहे? जेवणात पदार्थ, बेत कसा आहे?
 (त्रयस्तांनी गोंधळ केला की पालकांनी मूग गिळून गप्प बसणे !

▶ मुलीच्या पालकानीच अधिक भार उचलावा म्हणून अडून बसणे. 
(जणू मुलगी देवून ते फार मोठी चूक करत आहेत?) 
(ह्या वेळी मुलगा आणि मुलगी ह्यानी केलेल्या पसंतीचा, भावनेचा विचार केला जात नाही.)

▶ (क्वचित जर न जाणो) बाहेर कुठं कुणाच जमलं असेल तर.. 
(पालकांना अंधारात ठेवून) येणाऱ्या प्रत्येक स्थळांना नकार देणे. 
(वास्तविक पालकांशी बोलून यातूनही योग्यतो मार्ग काढायला हवा आणि तो काढता येतो यावर विश्वास नसणे!).

▶ विवाह ठरत आला असतानाच कुठून तरी काहींतरी विपरित किंवा अफवा कळताच त्या बाजूच्या माणसांना भेटून खरं खोटं शहानिशा न करताच पटकन नकार देणे.

▶ (कुठल्याही) वधू-वर सूचक केंद्राकडे नाव न नोंदविणे. (एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक स्थळे उपलब्ध होत असताना थोडी तरी असलेली देणगी फी भरण्याची इच्छा नसते. मात्र अंदाजपंचे फिरण्यात व लग्नकार्यात मोकाट कितीतरी खर्च होत असतो तो हिशोबात नसतो.)

▶ वधू-वर, पालक मेळाव्यांना उपस्थित न राहणे (मुला मुली ऐवजी स्वतःच हजेरी लावणे. 
(प्रत्येक वधुवर सूचक केंद्रा कडून स्थळांची यादी, फोटो उपलब्ध होतातच. त्या शिवाय उपस्थितांकडून त्यांच्या नातेवाईकांतील स्थळे माहित होत असतात. वधू-वरांना समक्ष पाहाता आल्यामुळे अनेक गावे फिरण्याचा वेळ, खर्च वाचतो. संचलकांकडून खूप मौलिक माहिती, उदाहरणे वअनुभव ऐकायला मिळतात. पुढची वाटचाल सोपी होते.)

▶ ह्यापैकी काही किंवा इतरही काही कारणे अशी असू शकतात. (गेल्या पाचेक वर्षातील इच्छापूर्तीच्या स्वअनुभवावरून इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय!)

▶ योग्य वाटल्यास किंवा योग्य असेल ते घ्यावे. आवडले तर पुढे पाठवावे, कारण बदल घडवायचा असेल तर एक व्यक्ती किंवा एखादी संस्था काही नाही करू शकत, तुमच्या मदती शिवाय... नाही का?

▶ आयुष्यात कार्य सफल व्हायच असेल? पुढं जायचं असेल? 
तर... तडजोड ही करणे आवश्यक च असते!

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...