Monday 18 December 2023

लग्नाची सात वचने

लग्नाची सात वचने 



पहिला वचन ती असं मागते की की कुठल्याही धार्मिक कार्य करताना जसं आज मी तुमच्या बाजूला बसली आहे तस तेव्हा पण मी तुझ्यासोबत बाजूला असेन .

दुसरा वचन ती बोलते की ज्याप्रमाणे आई-वडिलांचा सन्मान करतोस तसं माझ्याही आई-वडिलांचा सन्मान कर आणि त्यांचा आदर ठेव..,

तिसऱ्या वचना मध्ये ती असं बोलते की मला आजपासून ते म्हातारपण पर्यत माझा नीट सांभाळ करत राहशील जर हे तुला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार आहे.

चोथ्या वाचनात ती अस बोलते की तू कुठल्याही कर्तृत्वा पासून पळू नाही शकत आणि कुटुंबाचा सगळ्या गोष्टीचा सांभाळ तुम्ही करणार असाल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.


ती पाचवा वचन अस मागते की तुझ्या सगळ्या पैश्याचा लेन-देणं किंवा त्या जोडून असलेल्या गोष्टी करत असताना माझ्याशी त्याविषयी नक्की चर्चा करा ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सहावे वचन ती अस मागते की माझ्या मैत्रिणी किंवा आई-वडिलां समोर माझा अपमान कधी करणार नाही आणि वाईट व्यसनां पासून लांब राहशील ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सातवे वचन ती अस मागते की तू दुसऱ्या कुठल्या स्त्रीला ला बहिणीच्या किंवा आईच्या नजरेने बघशील आणि आपल्या दोघांमधे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आणणार नाहीस जर तूला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.❤️🔥

No comments:

Post a Comment

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...