Monday 18 December 2023

लग्न....

लग्न...




ती- तो आणि त्याचं सुरू झालेला सवसार 
आणि देवानी जुळून दिलेली नाती .
आयुष्यभर एकत्र राहण्याचे घेतलेले वचन सगळयांच्या साक्षीने आणि घातलेल्या सात फेऱ्या सुखाच्या सवसारच्या .

एक आनंद सगळयांच्या चेहऱ्यावरचा ,पाहुण्यांनी भरलेलं घर,
छोट्या मुलांची किलबिल .

सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात म्हणून आई-बाबांची चाललेली धडपड आणि आणि मनात थोडस लपवलेलं दुःख आपल्या मुलीच्या जाण्याच.

अंगाला लावलेली हळद त्या सोबत गाणारी गाणी आणि सगळ्यांची केलेली सोय आणि नाचण्यासाठी आणलेला Dj.
ठरलेली लग्नाची वेळ आणि त्या सोबतच भडजीने गायलेल्या मंगलाष्टक सोबत लग्नाच्या गाठी जुळलेल्या ..

जेवणाला लागलेली रांग आणि आहेर देण्याची लागलेली घाई आणि आठवणी जपून ठेवण्यासाठी काढलेले photo.

माहेरून सासरकडे जाण्याची वेळ आणि बांधलेला बसत्या सोबत पोहोचलेली गाडी.
डोळ्यात न समावणारे अश्रू सोबत दोघांनाही सुखी राहण्याच्या आशीर्वाद .❤️

No comments:

Post a Comment

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...