Friday, 22 December 2023

साथ तुझी हवी !

साथ तुझी हवी.... !


अश्रू माझ्या डोळ्यात दिसताच अलगच हातानी पुसून जवळ घेणारा तू हवास ….
चूक झाली तरी कधी न ओरडता सगळं सांभाळून घेण्यासाठी तू हवा…

कधी Phone नाही उचलला म्हणून फुगून बसले तर मला मनवुन घेणारा तू हवा ..
ते promises वगैरे न देता direct घरी मागणी घालून मला तुझ्या घरी नेणारा तू हवास….

कधी रागावून तू बसलीस की काहीतरी surprise घेऊन तुला खुश बघण्यासाठी तू हवीस..,
माझ्या सगळ्या गुण-दोषासकट मला Accept करण्यासाठी मला तू हवीस..

कधी बाहेर फिरताना कोणी बघितला आणि मला विचार की ही कोण आहे तर मला गप बसून ‘बायको आहे मी याची काही problem आहे का ‘ अस स्पष्टपणे सांगण्यासाठी मला तू हवीस..

दोघांनाही साथ लागते रे एकमेकांना अस Onside नाही टिकत जास्त वेळ …
या नात्यात कधी कोणी मोठा किंवा छोटा नसतो ,दोघांनाही एकमेकांना सांभाळून घेयला लागतो तेव्ह नात टिकतं…
सगळ्यांच नात असच तिकुदे अशी प्रार्थना करतो देवाकडे…❤️



Monday, 18 December 2023

सवसार...

सवसार
 

तुम्ही प्रेम करता एकमेकांवर सगळं मान्य आहे त्या verification फक्त लग्न झाल्यावरच भेटतं ,
फक्त msg वर propose accept करून काही होत नाही त्यासाठी सात जन्मांचे फेरे घ्यावे लागतात .

सवसार म्हणजे बैलगाडी ची दोन चाक असतात ,ते सोबत असतात तितपर्यंत सगळं ठीक असतं जेव्हा एक जरी चाक तुटलं पूर्ण सवसार उध्वस्त होतो .

मी अस नाही बोलत की सवसार करणं अवघड असतं ,ते अवघड किंवा सोपं ते तुमच्यावर असतं तुम्ही एकमेकांना कशी साथ देता त्यावर अवलंबून असतं ..

भांडण होतात ते सगळं normal आहे रे कारण दोन विचारांची माणसं एकत्र आल्यावर मतभेद तर असणारच पण त्याची हळू हळू सवय होऊन जाते .

सुरवातीला आपल्याला त्यांच्या काही गोष्टी नाही पटत पण ती व्यक्ती तशीच आहे असं समजून आपण त्याच विचार करणं सोडून देतो ..

प्रेम आणि लग्न यात खूप अंतर आहे रे ,सगळेच प्रेम करणारे लग्न नाही करत ,क्वचितच काही असतात जे पुढे जाऊन लग्न करतात …

Normal life ते married life मध्ये लग्न हीच एक विधी असते जी आपलं आयुष्य बनवते किंवा बिघडवते ..
एकदा लग्न झाल्यावर तुम्ही एकमेकांना दोष नाही देऊ शकत की यांच्यामुळे अस झालं किंवा यांची चुकी होती ,

चूक दोघांचीही असते यात कारण टाळी फक्त एका हाताने वाजत नसते 
उलट सवसार पण अस करा लोकांनी पण नाव ठेवली पाहिजे की किती सुंदर couples आहेत हे ..

सगळे फक्त अक्षदा टाकने पुरतेच तुमच्यासोबत असतील नंतर सवसार त्या दोघांनाच चालवावा लागतो ..❣️


नवरा - बायको


नवरा - बायको 


त्याचं नात कसलं सुंदर असतं ना दुःख तिला झाले का सावरणारा तो असतो ,इजा त्याला झाली का सांभाळून घेणारी ती असते .

त्यांच्या मध्ये कधीच पैसा येत नाही कारन दोघांना आपापल्या जबाबदाऱ्या माहीत असतात म्हणून Adjustment करायला शिकले असतात.

तिचे सगळे स्वभाव त्याला बरोबर माहीत असतात जेणेकरून ती कोणावर कधी रागावली की तो त्यांना जाऊन सांगतो
” अहो तिचा स्वभावच तसा आहे थोडयावेळाने होईल ती Normal”

आणि कधी कुठे गेल्यावर तो कधी कोणाशी नाही बोलल्यावर ती सांगते ” अहो त्यांचा स्वभाव शांत आहे जरा त्यांना जास्त बोलायला नाही आवडत “.

आपल्याला मुलगा/मुलगी झाल्याचा सर्वात जास्त आनंदमध्ये स्वतःकडे पैसे नसतानाही ,मित्रांकडून पैसे घेऊन महागतले पेढे आणून सर्वांना वाटतो .

कधी अचानक आपल्याला बायकोला एक साडी gift करतो ,तिच्या चेहऱ्यावरच आनंद बघण्यासाठी तेच तर लागतं ना सवसार चालवण्यासाठी .

कधी आपल्या नवऱ्याचा पगारणी सगळं नाही भागत हे बघून ती पण घरत काहीतरी धंदा चालू करते जेणेकरून त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठली अडचण नाही येणार .

सवसार चालवणं एवढं पण सोपं नसतं जेवढं दिसत आणि जे ज्यांचं सगळं नीट चालू आहे त्यांच्या मागे त्याची खूप मेहनत असत ते आपल्याला दिसत नाही .

तीला पण नवीन लग्न झाल्यावर खूप adjustment कराव्या लागतात कारण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात .

नवऱ्याला सोडून ती जास्त कोणाला ओळखत नसते म्हणून सुरवातीला थोडास problems येतात सगळ्यांचे स्वभाव ओळखण्यास ..

लग्नाची सात वचने

लग्नाची सात वचने 



पहिला वचन ती असं मागते की की कुठल्याही धार्मिक कार्य करताना जसं आज मी तुमच्या बाजूला बसली आहे तस तेव्हा पण मी तुझ्यासोबत बाजूला असेन .

दुसरा वचन ती बोलते की ज्याप्रमाणे आई-वडिलांचा सन्मान करतोस तसं माझ्याही आई-वडिलांचा सन्मान कर आणि त्यांचा आदर ठेव..,

तिसऱ्या वचना मध्ये ती असं बोलते की मला आजपासून ते म्हातारपण पर्यत माझा नीट सांभाळ करत राहशील जर हे तुला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार आहे.

चोथ्या वाचनात ती अस बोलते की तू कुठल्याही कर्तृत्वा पासून पळू नाही शकत आणि कुटुंबाचा सगळ्या गोष्टीचा सांभाळ तुम्ही करणार असाल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.


ती पाचवा वचन अस मागते की तुझ्या सगळ्या पैश्याचा लेन-देणं किंवा त्या जोडून असलेल्या गोष्टी करत असताना माझ्याशी त्याविषयी नक्की चर्चा करा ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सहावे वचन ती अस मागते की माझ्या मैत्रिणी किंवा आई-वडिलां समोर माझा अपमान कधी करणार नाही आणि वाईट व्यसनां पासून लांब राहशील ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सातवे वचन ती अस मागते की तू दुसऱ्या कुठल्या स्त्रीला ला बहिणीच्या किंवा आईच्या नजरेने बघशील आणि आपल्या दोघांमधे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आणणार नाहीस जर तूला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.❤️🔥

लग्न म्हणजे

लग्न म्हणजे....


हल्ली लग्न म्हणजे काहीच नाही राहिलं,
नात्याची कोणाला किंमतच राहिली नाही,
पाहिजे तेव्हा लग्न करतात थोडं काही झालं का लगेच divorse देतात, 

लग्न म्हणजे सात जन्म साथ  दिलेली वचनं असतात की सुख दुःखात आम्ही सोबत राहू अशी वचनं घेतलेली असतात एवढं सोपं वाटलं का तुम्हाला लग्न ,

कधी ती आजारी असली का तो कामाला सुट्टी घेऊन तिची काळजी घेईल हे माहीत असून की एक दिवसाचा पगार कापला जाईल कारन तिला कधीच एकटं नाही सोडणार अशी तिच्या बाबांना वचन दिलेलं असतं ,

लग्न म्हणजे adjustment असते जे करतात दोघ एकमेकांसोबत त्यांच्या आवडी निवडी बाजूला ठेऊन जी परिस्तिथी आहे त्यात कस भागवायच ह्याचा विचार करतात ,

लग्न म्हणजे एक परीक्षा असते ज्यात सुरवातीचे प्रश्न सोपे असतात पण शेवटी कठीण प्रश्नांना कस सामोरं जायचं ह्याच उत्तर शोधायला लागतो .

लग्न म्हणजे सांभाळून घेयचं असतं एकमेकांना मग ते चुका असो किंवा त्यांचा राग ,रुसवे ,फुगवे सगळं balance करावं लागतं .

लग्न म्हणजे एक आंनद आपल्या जोडीदारासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याचे ,
जे स्वप्न फक्त एकत्र बसून बघितले होते ते आता खरे करण्याची संधी .

लग्न म्हणजे एक गोड अनुभव जो सगळ्यांना भेटणार आहेत ज्यांनी ही post वाचली आहे म्हणून tension घेऊ नका कोणी single नाही राहणार, 
सगळं नीट होईल आणि सगळं happy होईल .❤️

लग्न....

लग्न...




ती- तो आणि त्याचं सुरू झालेला सवसार 
आणि देवानी जुळून दिलेली नाती .
आयुष्यभर एकत्र राहण्याचे घेतलेले वचन सगळयांच्या साक्षीने आणि घातलेल्या सात फेऱ्या सुखाच्या सवसारच्या .

एक आनंद सगळयांच्या चेहऱ्यावरचा ,पाहुण्यांनी भरलेलं घर,
छोट्या मुलांची किलबिल .

सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात म्हणून आई-बाबांची चाललेली धडपड आणि आणि मनात थोडस लपवलेलं दुःख आपल्या मुलीच्या जाण्याच.

अंगाला लावलेली हळद त्या सोबत गाणारी गाणी आणि सगळ्यांची केलेली सोय आणि नाचण्यासाठी आणलेला Dj.
ठरलेली लग्नाची वेळ आणि त्या सोबतच भडजीने गायलेल्या मंगलाष्टक सोबत लग्नाच्या गाठी जुळलेल्या ..

जेवणाला लागलेली रांग आणि आहेर देण्याची लागलेली घाई आणि आठवणी जपून ठेवण्यासाठी काढलेले photo.

माहेरून सासरकडे जाण्याची वेळ आणि बांधलेला बसत्या सोबत पोहोचलेली गाडी.
डोळ्यात न समावणारे अश्रू सोबत दोघांनाही सुखी राहण्याच्या आशीर्वाद .❤️

लग्न म्हणजे खेळ नसतो....

लग्न म्हणजे खेळ नसतो....



काही जणांना खूप excitement असेल ना लग्नाची की आपलं पण लग्न व्हावं आपला पण सुखाचा सवसार व्हावा पण एवढं पण सोपं नसत रे ..

काही जणांना लग्नाची एवढी घाई काय असते काय माहीत ,
अरे पाहिले पैसे कमवा की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्य enjoy करू शकाल…✌️

करतात काही जण adjustment पण एवढी पण घाई करू नका की लग्न झाल्यानंतर दोन वेळा जेवायला काय बनवायचं याच पण विचार करावा लागेल…🔥

खूप पैसा लागतो रे लग्न बोलल्यावर ,आणि परत काही कमी पडल का लोक मागून बोलायला तयारच असतात कारण त्यांना कुठे माहीत असतं आपल्या आई-वडिलांनी कसे पैसे कमावलेत ते …❤️

लग्नाची एवढी पण घाई करू नका रे आपल्या आई-वडिलांकडे तेवढे पैसे आहेत का किंवा आपल्या पगारातून सगळं होईल का ते बघा पहिले…

लग्न करताना फक्त आपलाच विचार नसतो करायचा रे कारण सगळ्यांना सोबत घेऊन लग्न पार पाडण्यास जी मजा आहे ती कशातच नाही …😊

लोकांना वाटत लग्न झाल्यावर सगळं नीट होत पण ते तेव्हा जेव्हा तुमचे विचार तेवढेच mature असतील जेवढे तुमच्या जोडीदाराचे..❤️

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...